हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची माहिती हवीय ‘आनंद महिंद्रा’ यांना, ‘उज्ज्वल निकम’ कोर्टात बाजू मांडणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका माथेफिरुने पेट्रोल टाकून जाळलेल्या महिला प्राध्यापिकेच्या प्रकरणी प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची विशेष फिर्यादी अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्त केली आहे. तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत सांगितले की जर एखादी व्यक्ती त्या महिला प्राध्यपिकेला किंवा तिच्या कुटूंबाला ओळखत असेल तर…कृपया मला सांगा… मी कशी मदत करु शकतो.

प्रध्यापिका अंकिता हिला काही दिवसांपूर्वी वर्धा हिंगणघाटमध्ये कॉलेजला जात असताना एक माथेफिरु विकेश नगराळेने पेट्रोल टाकून जाळले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी एक ट्विट करत सांगितले की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल. उज्ज्वल निकम सरकारी वकील असतील. उज्ज्वल निकम 1993 च्या मुंबई दहशतवादी हल्ला आणि कसाबच्या प्रकरणात सरकारी वकील निवडले गेले होते. या प्रकरणाचा सर्व खर्च सरकार उचलेलं.

त्यांनी अंकिताच्या जीववरील धोका टळावा यासाठी लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. नागपूरच्या रुग्णालयात असलेल्या अंकिताची प्रकृती नाजूक आहे परंतु स्थिर आहे. या घटनेमुळे राज्यातील लोक संतप्त आहेत. लोकांनी दोषीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

या घटनेवर बोलताना आनंद महिंद्र म्हणाले की अकल्पनीय, क्रुर..मी वृत्तपत्राचे पुढील पान देखील पलटू इच्छित नाही. ते पुढे म्हणाले की ती तिचा उपचाराचा खर्च कसा करत आहे. जर कोणी तिला किंवा तिच्या कुटूंबाला ओळखत असेल तर कृपया मला सांगा की मी कशी मदत करु शकतो.