अभिनेत्री अनन्या पांडेचा ‘शॉर्ट’ स्कर्ट आणि क्रॉप टॉपमधील स्टायलिश लुक ‘व्हायरल’ !

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनन्या पांडेने खूपच कमी काळात आपली मोठी फॅन फॉलोविंग तयार केली आहे. ती जिथे कुठे जाते तिथे तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी दिसते. सध्या ती आपला आगामी सिनेमा पती पत्नी और वो मुळे बिजी आहे. रविवारी ती मुंबईच्या ब्रांद्र्यात स्पॉट झाली.

यावेळी अनन्या पिंक आऊटफिटमध्ये दिसली. तिने व्हाईट क्रॉप टॉप घातला होता. पिंक कलरच्या शॉर्ट स्कर्टमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अनन्यांचा हा स्टनिंग लुक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या अनन्याचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती पती पत्नी और वो या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये अनन्या कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर सोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय अनन्या खाली पिली या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती ईशान खट्टसोबत झळकणार आहे. यातील त्यांचा लुकही रिलीज केला गेला आहे.

मकबूल खान दिग्दर्शन करत असलेल्या या सिनेमाची शुटींग 11 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पुढील वर्षी 12 जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com