अंदमानात पेट्रोल तब्बल २० रुपयांनी स्वस्त

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
संपूर्ण देश पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे होरपळत असताना अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना पेट्रोल फक्त ६९ रुपये प्रति लीटरने मिळत आहे. तेथे व्हॅटचा दर सर्वात कमी ६ टक्के असल्याने इंधन तब्बल २० रुपये स्वस्त आहे. महाराष्ट्रातील व्हॅटचा दर ३९ टक्के आहे. त्यामुळे महागाईच्या झळा राज्यातील नागरिकांनाच सर्वाधिक बसत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा राजे यांनी व्हॅटच्या दरात कपात केल्याने राजस्थानात पेट्रोल, डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झाले आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed375af6-b4b8-11e8-940e-699182cc5c26′]
खनिज तेलाच्या शुद्धिकरणानंतर पेट्रोल-डिझेलची किंमत सध्या ३८ ते ४० रुपये प्रति लीटर होते. त्यावर केंद्र सरकारचे १९.४८ रुपये उत्पादन शुल्क, पंपमालकाचे अडीच ते तीन रुपये कमिशन व अखेरीस राज्य सरकारचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) लावला जातो. महाराष्ट्रात सरकार तर व्हॅटखेरीज ९ रुपये दुष्काळी अधिभारही आकारते. यामुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात पेट्रोलवरील कराचा दर सध्या ३९.१२ टक्के व डिझेलवरील हा दर २४.७८ टक्के आहे. त्यामुळेच आज राज्यातील अनेक भागांत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेलची विक्री होत आहे.

 

राजघाटावरुन राहुल गांधीचा मोर्चा सुरु

महाराष्टाच्या शेजारील गुजरातमध्ये पेट्रोल व डिझेलवरील व्हॅटचा दर २५.४५ आणि २५.५५ टक्के, कर्नाटकमध्ये ३०.२८ आणि २०.२३ टक्के, मध्य प्रदेशात ३५.७८ आणि २३.२२ टक्के, तेलंगणात ३३.३१ आणि २६.०१ टक्के तर गोव्यात हा दर फक्त १६.६६ व १८.८८ टक्के आहे.

 तीनच राज्यात मोठा कर
महाराष्ट्रखेरीज अन्य फक्त दोनच राज्ये पेट्रोलवर ३५ टक्क्यांहून अधिक व्हॅट आकारतात. त्यामध्ये आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. १९ राज्ये व सर्व केद्रशासित प्रदेशांमधील पेट्रोलवरील व्हॅटचा दर ३० टक्क्यांहून कमी आहे. १७ राज्यांमध्ये डिझेलवरील व्हॅटचा दर २० टक्क्यांपेक्षा कमी आहे.vat
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने इंधन दरवाढ
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्याने, देशात पेट्रोलच्या दरात वाढ झाली. खनिज तेल डॉलरच्या माध्यमातून खरेदी होत असल्याने समस्या निर्माण झाल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
काँग्रेसने आज पुकारलेल्या भारत बंदमध्ये प्रामुख्याने पेट्रोल व डिझेल यांचा समावेश जीएसटी मध्ये करण्याची मागणी केली आहे़ जीएसटीमध्ये यांचा समावेश केला तर त्यांना २८टक्क्यांपेक्षा अधिक कर आकारणी करता येणार नाही़ त्यामुळे त्याला राज्यांचा विरोध आहे़ पण, त्यामुळे सामान्य नागरिक मात्र महागाईमध्ये होरपळून जात आहेत.
राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त, वसुंधरा राजेंची घोषणा
वसुंधरा राजे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये चार टक्क्यांनी कपात केली आहे, ज्यामुळे पेट्रोल-डिझेल प्रति लिटर अडीच रुपयांनी स्वस्त झाले आहे.

भारत बंदमध्ये २१ पक्षांचा सहभाग, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त, अनेक शाळांना सुट्टी जाहीर

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गौरव यात्रेदरम्यान हनुमानगडमधील रावतसरमधील एका सभेत इंधन स्वस्त करत असल्याची घोषणा केली. यानुसार राज्यात पेट्रोलवरील वॅट ३० टक्क्यांहून २६ टक्के आणि डिझेलवरील वॅट २२ टक्क्यांहून १८ टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दोन हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.