Andheri By Election | शिवसेनेचा अंधेरी पोटनिवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा, ऋतुजा लटके यांच्या मुलाची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेले दोन दिवस सुरु असलेला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा (Andheri By Election) वाद आता संपुष्टात आला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. लटके या महापालिकेत नोकरी करत असल्याने त्यांना नोकरीचा राजीनामा देणे भाग होते. तो त्यांनी दिला देखील होता. पण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब होत होता. त्यामुळे शिवसेनेने महापालिका आयुक्त इक्बाल चहल (Municipal Commissioner Iqbal Chahal) यांच्यावर दबावाखाली काम करत असल्याचे आरोप करत मुंबई उच्च न्यायलयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. न्यायलयाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा (Andheri By Election) मार्ग मोकळा झाला आहे.

 

ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र उदया सकाळी 11 वाजेपर्यंत दया, असा अंतरिम आदेश न्यायलयाने दिला आहे. त्यावर ऋतुजा लटके आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. (Andheri By Election)

उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला आहे. उद्धव ठाकरे,
अनिल परब (Anil Parab) आणि शिवसेनेकडून आम्हाला जो पाठिंबा मिळत आला आहे,
तो निवडणूक संपेपर्यंत असाच राहो. तसेच न्यायाची जी लढाई आम्ही लढत आहोत, त्यात आम्हाला यश मिळुदे,
अशी प्रतिक्रिया ऋुतुजा आणि रमेश लटके यांचे पुत्र अमेय लटके (Amey Latke) यांनी दिली.

 

Web Title :- Andheri By Election | The way for Shiv Sena to contest Andheri by-election is clear, the reaction of Rituja Latke’s son in few words

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

Rohit Pawar | भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत; फी वाढीवरुन रोहित पवारांचा भाजपवर आरोप