Rohit Pawar | भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत; फी वाढीवरुन रोहित पवारांचा भाजपवर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी फी वाढीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी विद्यापीठात भेट दिली. मी अजित पवारांना (Ajit Pawar) हा विषय सांगितला आहे. हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा राजकारणाचा नसून फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, असे रोहीत पवार (Rohit Pawar) म्हणाले. आंदोलक विद्यार्थी हे गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्याकडे अव्वाच्या सव्वा फी भरण्यासाठी पैसे नाहीत. विद्यापीठाने अन्यायकारक फी विद्यार्थ्यांवर लादली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्यासोबत बोललो आहोत. तेव्हा ते यावर काहीतरी निर्णय घेतील, असा आमचा विश्वास आहे, असे देखील रोहीत पवार म्हणाले.

 

गरीब घरांतून आलेल्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येवढी फी परवडत नाही. त्यांच्याकडे पैसा असता,
तर त्यांनी खासगी विद्यापीठांत प्रवेश घेतला असता. पण त्यांनी सरकारी विद्यापीठांत प्रवेश घेतल्याने आता त्यांना सवलतीचे शिक्षण देणे राज्य सरकारचे काम आहे,
असे पवार (Rohit Pawar) यावेळी म्हणाले. यावेळी पवारांनी भाजपच्या (BJP) कामावर देखील भाष्य केले.
भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत. त्यामुळे याद्या पारदर्शक असायला हव्या.
पूर्वी आपले विद्यापीठ कितव्या क्रमांकावर होते, आता कुठे आहे, असा प्रश्न देखील रोहीत पवार यांनी उपस्थित केला.

 

तसेच महाराष्ट्रात सध्या तोडातोडीचे राजकारण सुरु आहे. राज्यात तोडाफोडीचे राजकारण कोण करतो आहे, हे बघावे लागेल, असे रोहीत पवार म्हणाले.

 

Web Title :- Rohit Pawar | BJP works by looking at lists, they don’t look at the situation of students; Rohit Pawar accuses BJP of fee hike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

Pune Crime  | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR