Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

शिरवळ : पोलीसनामा ऑनलाईन – पणन महासंचालक, पुणे सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (Shashikant Ghorpade ) हे बेपत्ता (Missing) झाले असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन नीरा नदीमध्ये (Nira River) उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade ) हे शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका हाँटेलसमोरुन बेपत्ता झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात (Shirwal Police Station) दाखल करण्यात आली आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण ?
घटनेच्या वेळी शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) हे आपले मिञ प्रदिप मोहिते (Pradip Mohite) यांच्या कारमधून पुणे कार्यालयातून गेले होते. नेहमी कार्यालयातून ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असत. माञ उशिरपर्यंत ते घरी न आल्याने तसेच त्यांचा मोबाइल बंद येत असल्याने त्यांच्या पत्नीने शशिकांत यांच्या बंधूंना याबाबतची माहिती दिली. यानंतर त्यांच्या बंधूनी कार्यालयात चौकशी केली असता शशिकांत हे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कार्यालयातून गेल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शशिकांत यांची सगळीकडे शोधाशोध सुरु केली. दरम्यान शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका कंपनीसमोर संबंधित कार लावून शशिकांत चहा पित असल्याचे दिसून आले.

 

यावेळी शोधाशोध केली असता शशिकांत घोरपडे यांचा ठावठिकाणा मिळू न शकल्याने श्रीकांत घोरपडे (Shrikant Ghorpade) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली.
याचदरम्यान, नीरा नदीच्या पात्रालगत सीसीटीव्हीमध्ये एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले.
त्या व्यक्तीने पुढे नदीमध्ये उडी मारल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम,
भोर आपत्ती व्यवस्थापनचे भोईराज जलआपत्ती यांच्यामार्फत नीरा नदीपाञात शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Shashikant Ghorpade | director general of marketing shashikant ghorpade is missing likely to have committed suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chagan Bhujbal | तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून? छगन भुजबळांनी दिले उत्तर, म्हणाले…

Jalgaon Crime | गोलाणी मार्केटजवळील हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 9 जणांना घेतले ताब्यात

Pune Crime  | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR