Andheri Bypoll Result | ‘नोटा’चा अर्थ शिल्लकसेनेला कळत असावा…, शिंदे गटातील नेत्याचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे (Andheri Assembly Constituency) आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक (Andheri Bypoll Result) झाली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा लटके या केवळ बहुमतानेच नाही तर रमेश लटके यांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. या निवडणुकीत (Andheri Bypoll Result) नोटालाही जास्त मत मिळाली. यावरुन ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्यांनी आणि नवनियुक्त आमदार ऋतुजा लटके यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) टीकास्त्र सोडलं. यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी प्रत्युत्तर देताना ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. आतापर्यंतच्या भारतातील इतिहासात प्रथमच पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result) NOTA ला एवढी जास्त मतदारांची पसंती मिळाली आहे. याचा अर्थ शिल्लकसेनेला नक्कीच कळत असावा… असं ट्विटमध्ये म्हात्रे यांनी म्हटले आहे.

जनता आमच्या सोबत-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं. ही आता सुरुवात झाली आहे. लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. या पुढचे देखील सर्व विजय मिळवेन. आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. मात्र ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूक विरोधकांनी लढवली नाही. चिन्ह कोणतंही असो जनता आमच्या सोबत आहे. पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली. शिवाय नोटाला (NOTA) जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाला लगावला.

यावेळी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले,
जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला गेले आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्रात आले.
मात्र, आता गुजरातची निवडणूक (Gujarat Election) जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्र
प्रेम उफाळून आलं आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रकल्प देण्याची घोषणा केली, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Web Title :-  Andheri Bypoll Result | shinde group leader sheetal mhatre has criticized uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup | ठरलं ! सेमी फायनलमध्ये ‘या’ टीमशी होणार भारताचा सामना

Andheri Bypoll Result | अंधेरीत भगवा फडकला, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी साधला भाजपसह शिंदे गटावर निशाणा