Andheri Bypoll Result | अंधेरीत भगवा फडकला, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी साधला भाजपसह शिंदे गटावर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result ) शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे अंधेरीत मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result ) विजय मिळवल्यानंतर लटके आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने (Andheri Bypoll Result) स्पष्ट केलं. ही आता सुरुवात झाली आहे. लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. या पुढचे देखील सर्व विजय मिळवेन. आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. मात्र ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूक विरोधकांनी लढवली नाही. चिन्ह कोणतंही असो जनता आमच्या सोबत आहे. पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली. शिवाय नोटाला (NOTA) जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, असा टोला ठाकरे यांनी भाजपसह (BJP) शिंदे गटाला (Shinde Group) लगावला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला गेले आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्रात आले. मात्र, आता गुजरातची निवडणूक (Gujarat Election) जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्र प्रेम उफाळून आलं आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रकल्प देण्याची घोषणा केली, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे.
या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), वंचित (Vanchit),
कम्युनिस्ट पक्ष (Communists Party), संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि हितचितकांचं आहे.
त्या सर्वांचे मी आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title :-  Andheri Bypoll Result | shivsena chief uddhav thackeray reaction on andheri by election rutuja latke win

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Danushka Gunathilaka | वर्ल्ड कप खेळलेल्या श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनीत अटक

Rushabh Shetty | ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीचे बॉलीवूडबद्दल मोठे विधान; म्हणाला…