Andheri East By-Election | मराठी लोकसंख्या सर्वाधिक, पण इतरही प्रभावी, अंधेरी पूर्व मतदारसंघात भाषिक समीकरण महत्वाचे, भाजपाचा कस लागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Andheri East By-Election) सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाली आहे. त्यातच येथील शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके (Late MLA Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांची राजीनाम्याबाबत झालेली अडवणूक आणि त्यानंतर हायकोर्टाने दिलेल्या निकालाने त्यांना राज्यभरात प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे ही निवडणूक (Andheri East By-Election) खुपच चर्चेत आहे. येथे भाजपाने मुरजी पटेल (BJP Murji Patel) यांना उमेदवारी दिली आहे. येथील दोन्ही उमेदवारांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही उमेदवारांच्या पक्षांनी विजयाचा दावा केला आहे.

 

अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये मिश्र लोकवस्ती असून भाषिक समीकरण निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांचा (Marathi Voters) टक्का सर्वाधिक आहे. परंतु, इतर भाषिकांची संख्या लक्षणीय असून ती निर्णायक ठरू शकते. येथे विजय मिळवण्यासाठी उमेदवारांना योग्य भाषिक समीकरण जुळवून आणावे लागणार आहे.

 

अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये (Andheri East By-Election) मराठी भाषिक मतदारांची संख्या सुमारे 1 लाख 5 हजार 500 च्या आसपास आहे. तर उत्तर भारतीय मतदार (North Indian Voters) हे सुमारे 58 हजार 600 आहेत. मुस्लिम मतदारांची (Muslim Voters) संख्या सुमारे 37 हजार 900 एवढी आहे. येथील भाषिक आकडेवारीत गुजराती समाज हा चौथ्या स्थानावर आहे. त्यांची संख्या सुमारे 33 हजार 700 एवढी आहे. तर दक्षिण भारतीयांची संख्या 19 हजार 500 च्या आसपास आहे. ख्रिश्चन मतदारांची (Christian Voters) संख्या ही 14 हजार 900 एवढी आहे. तर इतर मतदार हे हजारांच्या आसपास आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला एका भाषिक मतदारांवर किंवा समाजावर अवलंबून राहता येणार नाही.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत येथील मतदानाचे आकडे हे शिवसेनेसाठी अनुकूल दिसत आहेत.
त्याचे कारण म्हणजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये रमेश लटके यांनी येथून बाजी मारली होती.
तसेच त्यांना मिळालेल्या मतांची संख्याही लक्षणीय होती.
त्यातच आता महाविकास आघाडीतून काँग्रेसने (Congress) पाठिंबा दर्शवल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचे पारडे जड आहे.
या दोन्ही पक्षांना 2019 मध्ये मिळालेल्या मतांची बेरीज ही विरोधी मुरजी पटेल यांना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे येथे भाजपाचा कस लागणार आहे.

 

Web Title :-  Andheri East By-Election | andheri east assembly constituency has the highest percentage of marathi but others are also significant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर