Andheri East By-Election | भाजपाने राज ठाकरेंच्या पत्रानंतर मुरजी पटेलांची उमेदवारी मागे घेतली तरी अंधेरीची निवडणूक होणारच, ‘हे’ आहे कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अंधरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri East By-Election) पार्श्वभूमीवर रोज नवीन घडामोडी घडत आहेत. आज महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संदर्भ देत राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपाला (BJP) ऋतुजा लटकेंच्या (Rituja Latke)  विरोधात निवडणूक न लढविण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार करू  असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही म्हटले आहे. परंतु खरा प्रश्न हा आहे की, जरी भाजपाने या निवडणुकीतून (Andheri East By-Election) माघार घेतली तरी निवडणूक बिनविरोध होईल का.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) 14 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून शिवसेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्यात थेट लढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जरी भाजपाने राज ठाकरेंच्या पत्राचा विचार करून मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली तरी येथे निवडणूक पार पडणार आहे. कारण सर्व उमेदवार अर्ज मागे घेतील हे जवळपास अशक्य आहे.

या पोटनिवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवारी पार पडल्यानंतर 14 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील (Prashant Patil) यांनी जाहीर केल्यानुसार अर्ज वैध ठरलेल्या 14 जणांमध्ये शिवसेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल, राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पक्ष), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पक्ष – पीपल्स), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पक्ष), अपक्ष चंदन चतुर्वेदी , चंद्रकांत रंभाजी मोटे, निकोलस अल्मेडा, नीना खेडेकर, पहलसिंग धनसिंग आऊजी, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे, राजेश त्रिपाठी आणि शकिब जाफर ईमाम मलिक यांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 17 ऑक्टोबर असून उद्यापर्यंत अर्ज मागे घेतल्यानंतर खरी लढत कुणामध्ये होणार हे स्पष्ट होईल.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार भाजपाच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी शिवसेनेच्या
उमेदवार ऋतुजा लटके यांच्यापुढे इतर उमेदवारांचे आव्हान असणार आहे.
त्यामुळे निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता खुपच कमी आहे.
इतके मात्र नक्की की मुरजी पटेल यांची उमेदवारी नसल्यास लटके यांचा विजयाचा मार्ग अतिशय सोपा होऊ शकतो.

Web Title :- Andheri East By-Election | andheri east by election if murji patel withdrawn his nomination against rutuja latke election will be conduct due to this reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा