T-20 World Cup | बुमराह शिवाय टीम इंडियाचं कसं होणार? कशा प्रकारे असेल भारताचा बॉलिंग अटॅक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून आयसीसी टी20 विश्वचषकाला (T-20 World Cup) सुरुवात झाली आहे. भारतीय संघ यंदा चषकाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. मात्र स्पर्धेपूर्वीच भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. यामुळे भारताचा बॉलिंग अटॅक कमकुवत झाला आहे. यामुळे संघात बुमराहच्या जागी अनुभवी मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची संघात निवड करण्यात आली आहे. पण बुमराहची डेथ ओव्हर गोलंदाजी करण्याची ताकद तितकी कोणत्याच गोलंदाजांमध्ये नसल्याने सर्व भारतीयांसह टीम इंडियासमोर विश्वचषकात (T-20 World Cup) रणनीती कशी असेल? तसेच बॉलिंग अटॅक कसा असेल असे प्रश्न सगळ्या भारतीयांना पडले आहेत.

अर्शदीपचा पर्याय

भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीला ओव्हर्स करुन विकेट्स घेण्यासाठी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सक्षम आहे. शमी देखील त्याला उत्तम साथ देऊ शकतो. याशिवाय फिरकीपटू आश्विन, चहल आणि अक्षर पटेल हे आहेतच. मात्र सर्वात मोठा प्रश्न उरतो तो डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीचा. आता याचा विचार करता शमीवर अधिक अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे यावेळी युवा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंहच्या रूपाने टीमसमोर पर्याय आहे. अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. (T-20 World Cup)

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर),
दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर

Web Title :- T-20 World Cup | jasprit bumrah going to miss t20 world cup what will be team india bowling strategy in wc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा