‘इलेक्शन’नंतरही CM जगनमोहन रेड्डी आणि चंद्राबाबूंमध्ये ‘वॉर’ सुरूच, ‘प्रजा वेदिका’ पाडल्यानंतर ‘TDP’च्या कार्यालयाला नोटीस

हैद्राबाद : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सत्तेत असताना नायडू यांनी बनविलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर वायएसआर काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी बुडलडोजर फिरवला. यानंतर आता चंद्राबाबू नायडू यांच्या TDP कार्यालयाला शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे.

ग्रेटर विशाखापट्टणम महानगरपालिका आयुक्तांनी टीडीपी शहराध्यांच्या विरोधात नोटीस बजावली आहे. एका आठवड्यात पक्षाच्या कार्यालयासंबंधीत सर्व कागदपत्र जमा करण्यास सांगण्यात आले आहे. जर एका आठवड्यात कागदपत्रे जमा केली नाहीत तर पक्षाच्या कार्यालय पाडण्यात येईल अशी नोटीस देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात आणखी एक कारवाई केली आहे. अमरावती शहरात नायडू यांनी बनवलेल्या प्रजा वेदिका पाडल्यानंतर त्यांच्या कार्य़काळात उभारण्यात आलेल्या १७ बिल्डींगला नोटीस पाठवली आहे. या इमारती अनधिकृतरित्या बांधण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या इमारतींना नोटीस पाठवण्यात आली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या कृष्णा नदी किनारी असलेल्या प्रजा वेदिका ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. या विरोधात दाखल केलेली याचिका आंध्र प्रेदश हाय कोर्टाने फेटाळून लावली होती. चंद्राबाबू नायडू यांनी २०१७ साली ही इमारत बांधली होती. २८ जून रोजी गोडाऊन, भोजन कक्ष, शौचालय आणि इतर भाग पाडल्यानंतर अधिकाऱ्यांनी मुख्य इमारत पाडण्यास सुरुवात केली होती.

सकाळचा चहा करतो ताण-तणावापासून सुटका, आहेत विविध फायदे

मधुमेहावर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड

दिवसातील २४ तासांपैकी २३ तास तुमचेच, फक्त १ तास शरीरासाठी द्या

मॉब लिचिंग’च्या माध्यमातून होणारे वाढते हल्ले तात्काळ रोखावेत, मुस्लिमांचे धरणे आंदोलन

तबरेज अंसारी मॉब लिंचिंग विरोधात पुण्यात आक्रोश आंदोलन