आताच अपडेट करा Chrome Browser ! Google कडून धोक्याचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अँड्रॉईड फोनमध्ये (Android Mobiles) असणाऱ्या गुगल क्रोम या ॲपमध्ये मोठा बग सापडला आहे त्यामुळं मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे. यासाठी गुगलनं (Google) लवकरात लवकर ॲप अपडेट करण्यास सांगितलं आहे.

या अपडेटमध्ये झिरो डे बग चा पॅच देण्यात आला आहे. हे एक महत्त्वाचं अपडेट आहे. असं न केल्यास तुमची माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. तुमची बँकिंग संबंधातील माहितीही धोक्यात येऊ शकते.

सर्च इंजिन गुगलनं सांगितलं की, क्रोम ब्राऊजरमध्ये (Google Chrome Browser) असलेल्या बगच्या (Bug) वापरातून युजरला नुकसान पोहोचवलं जाऊ शकतं. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, हॅकर्सना क्रोम सिक्योरिटी सँडबॉक्स बायपास करण्याचा पर्याय मिळाला होता. असं केल्यास हॅकर्स युजरच्या मोबाईलमध्ये त्यांच्या नकळत हानिकारक कोड रन करू शकतात. इतरही अनेक बदल करू शकतात.

गेल्या काही महिन्यात मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्येही अशा प्रकारचा बग सापडला होता. हा शोध गुगलच्याच सिक्योरिटी संशोधकांनी शोधला होता. गुगलनं सांगितलं की, क्रोम फॉर अँड्रॉईड ब्राऊजरसाठी सिक्योरिटी अपडेट रिलीज करण्यात आलं आहे. क्रोमचं नवीन व्हर्जन 86.0.4240.185 रिलीज करण्यात आलं आहे. यात CVE-2020-16010 बग फिक्स करण्यात आला आहे.