अंगारकी चतुर्थीस चिंतामणी मंदिर राहणार बंद

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर कडक निर्बंध घालण्यात येत आहेत अनेक ठिकाणी धार्मिक तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत परंतु येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी येत असल्याने तीर्थक्षेत्र थेऊर येथे हजारो भाविक गर्दी करणार आहेत अशावेळी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले होते त्यावर शासनाने मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे हवेलीचे अप्पर तहसीलदार चोबे यांनी माहिती दिली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झाल्यावर धार्मिक स्थळे बंद करण्यात आली तब्बल सहा महिन्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर देवळं दर्शनासाठी खुली झाली सुरुवातीला मर्यादीत असलेल्या भाविकांनी गेल्या काही दिवसात अनेक विक्रम केले. मागील महिन्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीला थेऊरला गर्दीचा विक्रम मोडला.

गणेश भक्तांमध्ये संकष्टी तसेच अंगारकी चतुर्थीचे अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळे भाविक दर्शनासाठी गणपती मंदिरात मोदी गर्दी करतात सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून दररोज रुग्णाच्या संख्येत अधिक भर पडते अनेक धार्मिक स्थळावर मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत.थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे येथे मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीस पन्नास ते साठ हजार भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे धोका नक्कीच वाढणार आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी त्वरित निर्णय घेऊन धोका टाळावा अशी ग्रामस्थात चर्चा होती यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन संभाव्य धोका लक्षात घेऊन मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.