Aniket Warty Cup T20 Cricket Tournament | ‘अनिकेत वर्टी करंडक’ टवे्न्टी-२० अजिंक्यपद १२ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद

पुणे : Aniket Warty Cup T20 Cricket Tournament | क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘अनिकेत वर्टी करंडक’ टवे्न्टी-२० अजिंक्यपद १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. (Aniket Warty Cup T20 Cricket Tournament)

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट मैदान (ब्रिलीयन्टस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) येथे झालेल्या स्पर्धेत अर्जुन देशमुख याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव करून विजेतेपद मिळवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा डाव ७७ धावांवर गडगडला. विहान सुतार (१४ धावा) आणि अमन सिंग (१५ धावा) केवळ या फलंदाजांनी दोन अंकी धावा केल्या. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या अर्जुन देशमुख याने १८ धावात ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. अर्जुन डोंगरे (२-७) यानेही दुसर्‍या बाजुने उत्तम साथ दिली.

हे आव्हान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १४ षटकामध्ये व ४ गडी गमावून पूर्ण केले. श्रवण राठोड याने ३३ धावा तर, अर्जुन गायकवाड याने १५ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्लेफेअरचे कार्यकारी संचालक अनिकेव वर्टी, उक्षेजक रमेश पाटील, कोटक बँकेचे उपाध्यक्ष बिक्रमजीत सेन, जे. अँड के. स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे डॉ. रौफ फाफिक, क्रिक चॅलेंजर्सचे संचालक नितीन सामल आणि नंदकिशोर कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि ५१ हजार रूपये तर, उपविजेत्या परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि २५ हजार रूपये देण्यात आले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज श्रेय असलेकर,
सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्जुन डोंगरे, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक झिदान मांगा, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पियुश अल्तेकर,
उदयोन्मुख खेळाडू रितम सेन अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २६.५ षटकात १० गडी बाद ७७ धावा (विहान सुतार १४, अमन सिंग १५,
अर्जुन देशमुख ३-१८, अर्जुन डोंगरे २-७) पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १४ षटकात ४ गडी बाद ७८
धावा (श्रवण राठोड ३३, अर्जुन गायकवाड १५, अमन सिंग ३-१२); सामनावीरः अर्जुन देशमुख.

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू-पियुश अल्तेकर;
सर्वोत्कृष्ट फलंदाज-श्रेय असलेकर;
Best Bowler – Arjun Dongre सर्वोत्कृष्ट गोलंदाज-अर्जुन डोंगरे;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-झिदान मांगा;
उदयोन्मुख खेळाडू-रितम सेन.

फोटो ओळीः विजेता व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ करंडकासह.

Web Title :- Aniket Warty Cup T20 Cricket Tournament | Aniket Warty Cup T20 Cricket Tournament ; Verok Vengsarkar Cricket Academy team won the title

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट

Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांना साद; म्हणाले…