डसॉल्टच्या पैशातून अनिल अंबानींची जमीन खरेदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनिल अंबानींना कंत्राट दिल्याचे कारण केवळ त्यांच्याकडे जमीन होती, असे डसॉल्टचा सीईओंनी सांगितले, हे सपशेल खोटे आहे. खर तर अंबानींकडे जी कथित जागा आहे ती डसॉल्टनेच दिलेल्या पैशांनी घेतल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
डसॉल्ट कंपनीने २८४  कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अनिल अंबानींच्या खात्यात ही रक्कम वळती करण्यात आली. डसॉल्टचा सीईओ कशाला खोटे बोलून अंबानींना वाचवत आहे. नुकसानीत असलेल्या कंपनीमध्ये का पैसे गुंतवले. यामागे एकच व्यक्ती आहे. मोदी यांनी अंबानीना फायदा करून दिला, असा आरोप करत याचे पुरावेही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवले.

२०१९ मध्ये कमळच फुलणार, सी वोटर्स आणि एबीपी माझाचा सर्वे 

कोणी नुकसानीत असलेल्या कंपनीत करोडो रुपये गुंतवेल का?, असा प्रश्न विचारुन अनिल अंबानीच्या कंपनीत डसॉल्टने पैसे गुंतविले ते केवळ नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुन असा आरोपही त्यांनी केला. मोदी हे चौकशीला घाबरत आहेत, असे सांगून राहुल गांधी म्हणाले,  जेव्हा सीबीआय याची चौकशी सुरु करु लागल्याचे समजले. तेव्हा त्यांनी रात्रीत सीबीआय प्रमुखाची उचलबांगडी करुन त्यांना सुट्टीवर पाठविले. आता न्यायालयालाही राफेल विमानांची किंमत देण्यास सरकारने नकार दिला आहे. केवळ ८ लाखांच्या कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मोदींनी राफेलची डील अंबानींना दिल्याने त्यांना थेट ३० हजार कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

जाहिरात

गुप्ततेचा जो करार करण्यात आला, त्यात कोठेही किंमतीचा उल्लेख नसल्याचे फॉन्सच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितले.
संसदीय संयुक्त समितीमार्फत केंद्र सरकारने राफेल व्यवहाराची चौकशी केल्यास त्याचे स्वागतच आहे, असे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

जाहिरात