अनिल अंबानींचा एनडीटीव्हीविरोधात १० हजार कोटींचा दावा

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने एनडी टीव्ही या वृत्तवाहिनीविरोधात येथील न्यायालयामध्ये १० हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडी टीव्हीच्या टुथ विरुद्ध हाइप या कार्यक्रमामुळे मानहानी झाल्याचा दावा करत १० हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी रिलायन्सने केली आहे. या दाव्याच्या पुराव्यासाठी रिलायन्सला सर्व कागदपत्रे उघड करावी लागणार असल्याने राफेल करारातील नेमके सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

एनडीटिव्ही समूहाच्या सीईओ सुपर्णा सिंह यांनी, आम्हाला त्रास देण्यासाठी व घाबरवण्यासाठी हा दावा ठोकण्यात आल्याचे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. आम्ही या विरोधात लढणार असून प्रसारमाध्यमांना त्यांचं काम करू न देण्यासाठीच दावा ठोकण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकरणावर रिलायन्स समूहाच्या अधिकाऱ्याना अनेक वेळा बोलावण्यात आले, त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सुपर्णा यांनी म्हटले आहे.

एनडीटिव्हीच नाही तर सगळ्यांनी राफेल करारासंदर्भात बातम्या दिल्या असूनही केवळ एनडीटिव्हीलाच नोटिस पाठवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. भाजपाशासित केंद्र सरकार फ्रान्सच्या दासूकडून ५८ हजार कोटी रुपयांना राफेल ही लढाऊ विमाने घेत आहे. या करारामध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीशी दासूला करार करावा लागण्याच्या अटीवरून रणकंदन पेटले आहे. या करारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जात बुडविलेल्या आपल्या मित्राला अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये मिळवून दिल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनीही केला आहे. आत्तापर्यंत राजकीय मंचावर लढले गेलेले राफेल वॉर आता या बदनामीच्या दाव्यामुळे कोर्टात गेले आहे. तिथे काय यु्क्तिवाद होतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आगामी निवडणुकात राफेल हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यावर भाजपचे अन्य मंत्रीच बोलत आहे. मात्र, या करारामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप याबाबत एक अवाक्षरही काढलेले नाही. त्यामुळे राहुल गांधी हे त्यांना सातत्याने आवाहन करीत आहेत. पंतप्रधांनाचे मौनच भष्ट्राचाराची कबुली असल्याची टीका ते आता करु लागले आहेत. आतापर्यंत रिलायन्स अथवा केंद्र सरकार राफेलबाबत कोणतीही गोष्ट जाहीर करीत नव्हते. या दाव्यानिमित्त आता रिलायन्सला आपल्याकडील सर्व कागदपत्रे कोर्टासमोर सादर करावी लागतील व त्यातून कंपनीच्या स्थापनेपासून कराराबाबत काय काय बोलणी झाली याची माहिती एनडी टीव्हीला द्यावी लागणार आहे़ त्यातून सत्य बाहेर येऊ शकणार आहे.

राज्यातील २ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या