Ajit Pawar On Eknath Shinde Group | अजित पवारांची शिंदे गटावर पुन्हा खोचक टोलेबाजी, म्हणाले – ‘रात्री बावचळून उठतात, खोकं, खोकं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Eknath Shinde Group | 50 खोके, एकदम ओके या घोषणा सत्ताधार्‍यांना झोंबल्या. खरंच… खोटं नाही सांगत. रात्री बावचळून उठतात. खोके खोके खोके… ओके ओके ओके! अरे कशाचं खोकं आणि कशाचं ओके? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होते. (Ajit Pawar On Eknath Shinde Group)

 

अजित पवार म्हणाले, शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकत आहे का? शिंदे सरकारमध्ये दबाव झुगारण्याची ताकद नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले आहे की कारण नसताना कुणाच्यासमोर झुकायचे नाही. पण इथे तर झुकायला सुरुवात झाली. अजून तर अडीच महिनेही नाही झाले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी म्हटले होते
की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेदांता प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले.
वेदांताने कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राला निवडले होते. मात्र, आता गुजरातचे नाव समोर येत आहे.
महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल, तर कदापी खपवून घेतले जाणार नाही.

 

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहात विरोधकांना म्हटले होते की, चुन चुन के मारेंगे.
यावरून खोचक टोला लगावताना अजित पवार म्हणाले, बुलढाण्याचे एक आमदार म्हणाले की एकनाथ शिंदेंविरोधात बोलाल
तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे… अरे तुला काय घरच्या किड्या-मुंग्यांसारखे वाटलो का? चुन चुन के, गिन गिन के मारेंगे.

 

Web Title :- ncp ajit pawar mocks cm eknath shinde group mla on alliance with bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vitamin-C | केवळ लिंबू आणि संत्र्यातच नव्हे, ‘या’ 5 फूड्समध्ये सुद्धा असते व्हिटॅमिन-सी चे भरपूर प्रमाण

Diabetes Diet Tips | 3 असे नट्स, ज्यांचे डायबिटीज रूग्णांनी आवश्यक केले पाहिजे सेवन

Ginger Make Hair Strong | तुमच्या केसांना सुद्धा मजबूत बनवू शकते आले, जाणून घ्या कसा करायचा आहे वापर

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | टक्केवारीमुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, माझ्याकडे पुरावे; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप