Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या पत्नीला देखील ED ने बजावलं समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सक्तवसुली संचालनालयाच्या (enforcement directorate) रडारवर असणारे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा सलील देशमुख (Salil Deshmukh) यांना कालच सक्तवसुली संचलनालयाकडून (enforcement directorate) समन्स बजवण्याची शक्यता होती. सलील देशमुख (Salil Deshmukh) यांच्या कंपनीने उरण तालुक्यात (Uran Taluka) खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीचा तपास करण्यास ED ने सुरुवात केलीय. यांनतर आता अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख (Aarti Deshmukh) यांना ED ने समन्स बजावली असून त्यांना उद्या सकाळी 11 वाजता ED कार्यालयात चौकशीसाठी (Inquiry) हजर राहण्याचे आदेश देखील दिले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील कमलेश घुमरे (Kamlesh Ghumre) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सीबीआयने (CBI) आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी अनिल देशमुख यांनी हाय कोर्टात (High Court) दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे. परंतु, अजून सक्तवसुली संचलनालय (ED) या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

Web Titel :- anil deshmukh | enforcement directorate summons wife of anil deshmukh former home minister of maharashtra

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ