Anil Deshmukh | ‘माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत?’ (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटीचे खंडणीचे आरोप केले होते. यांनतर देशमुखविरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. तर, मागील अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अखेर अनिल देशमुख आज (सोमवारी) सक्तवसुली संचालनालय (ED) कार्यालयात स्वतः हजर झाले आहेत. पंरतु, त्यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत.

 

 

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, मला ईडीने (ED) समन्स बजावल्यानंतर मी ईडीला तपासात सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका हाय कोर्टात (High Court) आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सुप्रिम कोर्टातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.

माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहे,” असा सवाल अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपस्थित केला आहे. त्यावेळी पुढे ते म्हणाले की, परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. ते भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेलीये. परमबीर सिंगांवर पोलीस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझेने परमबीर यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. याआधी तो तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले. त्यामुळे अशा लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप होतायत. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, याचं मला दुःख आहे. मी नैतिकतेला धरून चालणारा माणूस आहे. गेल्या 30 वर्षात माझ्यावर एकही आरोप झालेला नाही. असं देशमुख म्हणाले.

हे देखील वाचा

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh | former home minister of maharashtra anil deshmukh asks where is parambir singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update