Anil Deshmukh Money Laundering Case | अनिल देशमुख मुख्य आरोपी ! मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ED कडून 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh Money Laundering Case | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणाची (Anil Deshmukh Money Laundering Case) चौकशी सुरू आहे. तर, सक्तवसुली संचालनालयाला (ED) अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली असा दावा ईडीने केला होता. याप्रकरणी तपास आता पुर्ण झाला असून ईडीने आज मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष ईडी कोर्टात (ED Court) आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केलेत. यामध्ये 7 हजार पानांचे आरोपपत्र असून मुख्य आरोपी अनिल देशमुख यांना करण्यात आलेय.

 

मुख्य आरोपी अनिल देशमुख यांच्यानंतर सह आरोपी म्हणून अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे (Secretary Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना दाखवले गेले आहे. दरम्यान, या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) याला ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना फरार घोषित करण्यात आले. अनेकवेळा समन्स बजावूनही ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. परंतु, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे या करता ऋषिकेश देशमुख याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र अद्याप याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, अनिल देशमुख (Anil Deshmukh Money Laundering Case) यांच्या अटकेनंतर तात्काळ त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मिळावी,
या सोबतच त्यांना तात्काळ जामीन मिळावा याकरिता देशमुख यांच्याकडून खूप प्रयत्न करण्यात आले.
परंतु ईडीचे म्हणणे प्रत्येक वेळेस न्यायालयाने मान्य केल्याने 14 दिवसांपेक्षा जास्त ED कोठडीत अनिल देशमुख यांना काढावे लागले तर अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
याप्रकरणी आज (बुधवारी) ED ने विशेष न्यायालयात (Special Court) आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्र दाखल केल्यानंतर देशमुख यांच्या जामिनाचा (Bail) मार्ग मोकळा झाला असून लवकरच अनिल देशमुख यांच्याकडून जामीनाकरता अर्ज केला
जाईल असं त्यांच्या वकील टीमकडून म्हटले. तर, अनिल देशमुखांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले
असले तरी देशमुख परिवारातील आणखीन एका सदस्याला अटक होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :- Anil Deshmukh Money Laundering Case | ed names anil deshmukh as main accused in the 7000 pages chargesheet filed in the money laundering case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | नवीन वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळेल भेट, 26 हजार रुपये होऊ शकतो किमान पगार; जाणून घ्या

Beed Crime | भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची छापेमारी; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजेंद्र म्हस्केंसह 50 जणांविरुद्ध FIR

Pune Crime | पुण्यातील शाम सोनटक्के खून प्रकरणातील आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर