परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी ‘या’ कारणामुळं वाढणार ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन वर्षापासून राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नाशिक Nashik पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या 3 दिवसांपासून विविध शासकीय अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. सोमवारी (दि.31) तक्रारदार निलंबित मोटार निरिक्षक गजेंद्र पाटील यांना चौकशीसाठी बोलावले होते. संपुर्ण दिवसभर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. मात्र ही चौकशी अर्धवट असून मंगळवारी (दि. 1) पुन्हा पाटील यांना चौकशीकरिता बोलावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकुणच या आरटीओ प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांच्यासह विविध शासकिय अधिकाऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे.

नवाब मलिकांचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘7 वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही’

पाटील यांच्या चौकशीमधून काही बाबी समोर आल्या असून अंशत: चौकशी सोमवारी पुर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात अनिल परब Anil Parab यांच्यापासून तर थेट परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यापर्यंत विविध अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचा गंभीर आरोप याच खात्यातील एका निलंबित मोटर निरिक्षक गजेंद्र पाटील यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. नाशिकमधील पंचवटी पोलिसांकडे तक्रार अर्ज आल्यानंतर पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी स्वत: यात लक्ष घालून गुन्हे शाखेच्या उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश दिले आहे. आतापर्यंत ढाकणे यांच्यासह 8 शासकीय अधिकाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहे. सोमवारी पाटील यांची चौकशी करत जबाब नोंदविण्यात आले आहेत.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

Pimpri-Chinchwad Lockdown : पिंपरीत ‘या’ गोष्टी वगळता सर्व दुकाने खुली होणार, जाणून घ्या काय बंद काय सुरु