RCEP वर मोदी सरकारच्या पशुपालन मंत्रालयाचा इशारा, 6.5 कोटी शेतकऱ्यांना होणार तोटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियातील देशांमध्ये आणि सहा अन्य देशांमध्ये प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) नुसार मुक्त व्यापार करारामध्ये डेअरी या व्यवसायाला सामील करण्यासाठी केंद्रीय पशुपालन मंत्रालय आणि डेअरी मंत्रालयानेदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

आरसीईपीमध्ये डेअरी व्यवसायाला समाविष्ट करून घेण्याबाबत अनेक डेअरी संघटनांनी नकारात्मक भूमिका दाखवली असल्याची माहिती डेअरी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. ज्यामध्ये अमूल सारख्या मोठ्या डेअरी उत्पादनाचा देखील समावेश आहे याबाबतची अधिक माहिती वाणिज्य मंत्रालयाला देण्यात आली आहे.

वाणिज्य मंत्रालयाला दिली माहिती
या आधी किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगिलते होते की याबाबतची अधिक माहिती वाणिज्य मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. तोमर म्हणाले होते, आमच्यासाठी देशातील शेतकऱ्यांचे हित महत्वाचे आहे त्यामुळे आम्ही आरसीईपी बाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला कळवले आहे.

कोणते कोणते देश असतील या करारामध्ये
तोमर यांनी सांगितले की आपल्यामुळे अन्य देशाचे नुकसान होऊ नाही हाच आमचा प्रयत्न असतो. आरसीईपीमध्ये भारत आणि आशियातील दहा सदस्य देशांसहित जापान, दक्षिण कोरिया, चीन, आस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा देखील समावेश आहे.

काय आहे शक्यता
डेअरी व्यापाऱ्यांना आशा आहे की डेअरीयुक्त पदार्थाना आरसीईपीमध्ये सामील केल्याने ऑस्ट्रेलियातून आणि न्यूझीलंडमधून आयात कराशिवाय अनेक दुग्ध पदार्थ भारतात येतील.

स्वदेशी जागरण मंचाने देखील केला विरोध
दूध उत्पादकांना सध्या 28-30 रुपये प्रति लिटर इतका दर मिळतो परंतु न्यूझीलंडवरून स्वस्त दरात दुग्ध पदार्थ भारतात आल्याने हा दर सुद्धा दुधाला मिळणार नाही अशी खंत स्वदेशी जागरण मंचाच्या अश्वनी महाजन यांनी व्यक्त केली होती. तसेच हा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आहे त्यामुळे सरकारला यावर गांभीर्याने विचार करावा लागणार आहे असे महाजन यांनी म्हंटले आहे. तर या सामिलीकरणामुळे देशातील 6.5 कोटी शेतकरी प्रभावित होतील असे मत अध्यक्ष दिलीप रथ यांनी व्यक्त केले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी