Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने केले दुसऱ्यांदा लग्न; लिपलॉक करताना व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला ओळखले जाते. अंकिताने तिच्या अभियनाच्या बळावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेतील ‘अर्चना’ ही भूमिका जबरदस्त गाजली. तिच्या या भूमिकेमुळे अंकिताला घराघरात ओळख मिळाली. सध्या अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आली आहे. तिने दुसऱ्यांदा लग्न (Ankita Lokhande Second Marriage) केले असून तिची लीपलॉक करतानाची व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या तिचे वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. यावेळी तिने तिचे पिंक कलरच्या साडीमधील फोटो शेअर केले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते खूश झाले आहेत. यावेळी तिने सिक्वीनची साडी स्टाईल केली असून सोबत रिव्हिलिंग ब्लाऊज स्टाईल केला आहे. अंकिताचा हेव्ही नेकलेस लक्षवेधी ठरत असून तिने लाईट मेकअप केला आहे. ती पती विक्की जैनसोबत (Vicky Jain) आकर्षक पोज दिल्या आहेत. यावेळी अंकिताचा पती (Ankita Lokhande Husband) विक्की देखील फॉर्मल लूकमध्ये दिसत असून त्याने गॉगल स्टाईल केला आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने पती विक्की जैन सोबत लग्न केले आहे. त्यांचे या आधी 2021 साली लग्न झाले होते. मात्र या कपलने पुन्हा एकदा लग्न केले आहे. यावेळी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला असून त्यानंतर लिपलॉक (Ankita Lokhande Liplock) देखील केले आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. अंकिताने पोस्टखाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”आम्ही परत लग्न केले.” तसेच लिहिले आहे की, “मला एका सिताऱ्याची इच्छा होती, मी वळले आणि तिथे तू होतास… मी तुझ्यावर खूप प्रेम करते मिस्टर जे.” असे अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम