काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून शिंदे यांच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. तसेच गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके  आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना निलंबित करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

[amazon_link asins=’B00RM1EC1S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df55b2e1-8ef4-11e8-95c9-cb94eb59de17′]

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी हे लेखी आश्वासन दिले असून त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर सुरु असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी कानडगाव येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर हे ठिय्या आंदोलन सुरु झाले होते़

दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु असून औरंगाबाद – पुणे महामार्गावर मोर्चेकऱ्यांचा  ठिय्या आंदोलन सुरु आहे. नवी मुंबईतील कामोठे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळले. सोलापूर-तुळजापूर रोडवरील पर्ल गार्डन समोर एसटी बस वर दगडफेक, दोन बसचे नुकसान करण्यात आले आहे.