आणखी एका अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसापासून बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपवली आहे. बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच तमीळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. इंद्र कुमार असं त्याच नाव असून चेन्नईतील त्याच्या मित्राच्या घरी सकाळी तो मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. इंद्र कुमार विवाहित असून त्याला एक मुलगादेखील आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मित्राला भेटण्यासाठी इंद्र कुमार आला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतावस्थेत आढळला. जेव्हा त्याच्या मित्राला इंद्र कुमार बाबत समजले तेव्हा त्याने पोलिसांना कळवले.

पोलिसांना त्याच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी चित्रपट पाहण्यासाठी इंद्र कुमार गेला होता. त्यानंतर तो त्याच्या मित्राच्या घरी एकटाच होता. सकाळी जेव्हा मित्र घरी आला तेव्हा त्याने दरवाजा वाजवला. मात्र घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने दरवाजा खोलला तेव्हा इंद्र कुमार मृतावस्थेत दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना कळवले.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. इंद्र कुमारच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून घटनास्थळी पोलिसांना कोणतीच सुसाइड नोट सापडली नाही. दरम्यान इंद्र कुमार मालिकेत काम करत होता आणि काही नवीन संधीच्या शोधात होता. त्याला काम मिळत नव्हते त्यामुळे तो टेन्शनमध्ये होता. अशीही चर्चा सुरु झाली आहे.