निरोपापूर्वी Donald Trump यांचा चीनवर डिजिटल स्ट्राइक; Alipay, WeChat Pay सह अनेक चीनी अ‍ॅप्सवर लावला बॅन

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचा निरोप घेण्यापूर्वी चीनला आणखी एक झटका दिला आहे. त्यांनी अलिपे, वुईचॅट पे सह काही अन्य चीनी अ‍ॅपवर प्रतिबंध लावला आहे. अमेरिकेने बॅनचे कारण सांगताना म्हटले की, हे अ‍ॅप्स यूजर्सची माहिती चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडे सोपवत होते. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभवानंतर आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विरूद्ध अनेक पावले उचलली आहेत. 20 जानेवारीपूर्वी असे आणखी काही निर्णय पहायला मिळण्याची शक्यता आहे.

व्हाइट हाऊसकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, प्रतिबंध संबंधी कार्यकारी आदेश पुढील 45 दिवसात प्रभावी होईल. येथे लक्षात घेण्यासाठी गोष्ट ही आहे की, चीनी अ‍ॅप्सवर बॅन लावण्यापूर्वी डोनाल्ड ट्रंम्प प्रशासनाने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, आदेश आणि त्याच्या अंमबलबजावणीवर टीम बायडेनसोबत चर्चा करण्यात आली नाही.

याकारणामुळे लावला बॅन
या बॅन बाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले की, अलिपे, वुईचॅट पे सह काही अन्य चीनी अ‍ॅप्स मोठ्या संख्येने डाऊनलोड केली जात होती, ज्यामुळे व्यापक स्तरावर डेटाचा दुरूपयोग होण्याची शंका निर्माण झाली होती. हे पाहता संबंधित अ‍ॅप्सवर बॅन लावण्यात आला.

अमेरिकेने Alipay, CamScanner, QQ Wallet, SHAREit, Tencent QQ, VMate, WeChat Pay and WPS Office या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. शिवाय ट्रम्प यांनी वाणिज्य सचिवांना या गोष्टीचे अवलोकन करण्यास सांगितले आहे की, आणखी कोणत्या अ‍ॅप्सचा प्रतिबंधित यादीत समावेश करता येईल. म्हणजे आगामी काही दिवसात चीनविरोधात आणखी एक स्ट्राइक पहायला मिळू शकतो.