Anti Corruption | पोलीस उप अधीक्षकाच्या घरात 25 लाखाची बेहिशोबी रोकड आढळल्याने प्रचंड खळबळ, अ‍ॅन्टी करप्शनकडून रक्कम जप्त

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  परभणी येथील सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल (sub-divisional police officer Rajendra Gamkaran Pal) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (Anti Corruption) ससेमिरा लागला आहे. अपघात प्रकरणात दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागून तडजोडीत दीड कोटी रुपये घेण्याचे पाल याने कबूल केले होते. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption) एका पोलीस कर्मचाऱ्याला 10 लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर राजेंद्र पाल याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये लाखो रुपयांची रोकड आणि महत्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत.

लाचखोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल (sub-divisional police officer Rajendra Pal) याच्यावर एसीबीने (ACB) कारवाई केली. यानंतर त्याच्या मुंबईतील फ्लॅटची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्याच्या घरातून तब्बल 24 लाख 84 हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

2 कोटी लाचेची मागणी करुन 10 लाखाचा पहिला हप्ता घेताना पाल व त्याच्या ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश चव्हाण (Police Ganesh Chavan) यांना एसीबीने शुक्रवारी (दि.23) परभणीतील (Parbhani) सेलू विभागाचे उपविभागीय पोलीस कार्यालयात अटक केली. पाल याची अनेक वर्षे मुंबईत सेवा झाली आहे. पाल पदोन्नतीवर परभणीला बदली होण्यापूर्वी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात (Wadala Railway Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) होता.

राजेंद्र पाल (Rajendra Pal) याचे कुटुंब मुंबईत राहत असून पाल याच्यावर कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने आज (शनिवार) सकाळपासून त्याच्या पश्चिम उपनगरातील फ्लॅटची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाल याच्या घरात 24.84 लाख रुपये मिळाले. तसेच बँकेची पासबुके व इतर मालमत्तेची दस्तऐवज जप्त केली. त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

सेलू पोलीस (Sailu police station) ठाण्यांतर्गत 3 मे 2021 रोजी एका अपघात प्रकरणी (Accident case) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली होती.
9 जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. ‘तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे.
यातून तुला बाहेर पडायचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील’ असे सांगितले.
तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करुन अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी करुन तडजोडीत 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर तक्रारदाराच्या भावाकडून उपविभीगाय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी
संलग्न मानवत पोलीस ठाण्यातील (manwath police station) पोलीस कर्मचारी
गणेश लक्ष्मणराव चव्हाण (Ganesh Laxmanrao Chavan) यांना 10 लाख रुपयांची लाच
स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

Web Title : Anti Corruption | 25 lakh cash seized sub divisional police officer Rajendra Gamkaran Patil’s flat at mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 250 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप; निलेश शिंदेंचं कार्य कौतुकास्पद – प्रशांत जगताप

Weather Forecast | आज पुण्यासह 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या कशी असेल कोकणातील स्थिती ?

Vaccination Under 18 | व्हॅक्सीनसंबंधी आली खुशखबर ! सप्टेंबरपासून सुरू होईल 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे लसीकरण !