Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | दीड हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहाय्यक अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | पाचोरा (Pachora) येथे शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर (Power Trailer Machine) मिळणारी सबसिडी (Subsidy) बँक खात्यात जमा करण्यासाठी दीड हजारांची लाच घेताना (Accepting Bribe) जळगाव लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon) अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.24) कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला (Agricultural Assistant Officer) रंगेहाथ पकडले. ललितकुमार विठ्ठल देवरे (Lalit Kumar Vitthal Deore) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेले तक्रारदार यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत (Agricultural Mechanization Scheme) शेती कामासाठी लागणारे बीसीएस पावर ट्रेलर मशीन घेण्यासाठी आईच्या नावाने ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून हा अर्ज मंजूरही झाला होता. मशीन खरेदीनंतर या योजनेनुसार मिळणारी अनुदानाची 85 हजार रुपये रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा होते. ती रक्कम जमा करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार देवरे याने दीड हजार रुपयाच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

तक्रारदाराने याप्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.
त्यानुसार गुरुवारी सापळा रचून देवरे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
या कारवाई पथकात पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील (Deputy Superintendent of Police Shashikant Patil),
पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav), एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांचा सहभाग होता.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | in the trap of agricultural assistant Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा