Anti Corruption Bureau (ACB) Sangli | 1 लाखाची लाच घेताना जलसंपदा विभागाच्या अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कामाची निविदा मंजूर झाल्यानंतर त्याचा आदेश काढण्यासाठी कंत्राटदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) ताकारी – म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागातील कार्यकारी अभियंत्यासह दोघांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Sangli) रंगेहात पकडले. यामध्ये एका खासगी व्यक्तीचा समावेश आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Sangli) ही कारवाई शुक्रवारी (दि. 5) रात्री उशिरा केली.

 

कार्यकारी अभियंता (Executive Engineer) सुर्यकांत मारुती नलवडे Suryakant Maruti Nalwade (वय – 52) व खासगी व्यक्ती राहुल तानाजी कणेगावकर Rahul Tanaji Kanegaonkar (वय -37 रा. विजयनगर, सांगली) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात (Sanjaynagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Sangli) शुक्रवारी रात्री कुपवाड रस्त्यावरील सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात केली.

 

तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. त्यांना ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन (Takari-Mhaisal Upsa Irrigation) व्यवस्थापन कार्यालयाकडून ऑनलाईन ई-टेंडरद्वारे वारणातील वसाहत अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्ती व मजूर पुरवण्याचे काम मिळाले होते. या कामाचा आदेश काढण्यासाठी नलवडे याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने 1 ऑगस्ट रोजी सांगली एसीबीकडे तक्रार केली होती.

 

सांगली एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता नलवडे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार वारणालीत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन आले.
त्यावेळी नलवडे याने ही रक्कम कणेगावकर यांच्याकडे देण्यास सांगितले.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची एक लाख रुपये रक्कम स्वीकारताना पथकाने कणेगावकर याला ताब्यात घेतले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे (Deputy Superintendent of Police Sujay Ghatge),
अंमलदार पोलीस हवालदार कलगुटगी, सलीम मुलाणी पो. ना. अविनाश सागर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Anti Corruption Bureau (ACB) Sangli |  Water Resources Department Engineer arrested by acb for accepting bribe of 1 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा