Anti Corruption Bureau Nagar | अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  ठेकेदाराने केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी (Demand for bribe) केल्याप्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेतील (Ahmednagar Municipal Corporation) मुख्य लेखाधीकाऱ्याला (Chief Accountant) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Nagar) ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Nagar) मुख्य लेखाधिकारी प्रविण गोपाळराव मानकर Pravin Gopalrao Mankar (वय-52 मुळ राहणार – 198, दिल्ली गेट, मानकर गल्ली, अहमदनगर, हल्ली मुक्काम- 102, फॅन्टसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी, पुणे) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (tofkhana police station) आज (बुधवार) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार (वय-34) यांनी व त्यांचे मावसभाऊ यांनी ठेकेदार (Contractor) म्हणून नगर महापालिकेच्या केलेल्या कामाची बिले मंजूर करुन तक्रारदार यांना धनादेश (Check)
देण्याच्या मोबदल्यात मानकर यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी 7 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
प्रवीण मानकर यांच्या विरोधात तक्रार केली.
त्याच दिवशी विभागाने पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी करुन 15 हजार स्विकारण्याची संमती दर्शवली.
त्यानुसार आज तोफखाना पोलीस ठाण्यात मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले.

 

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (Nashik ACB SP Sunil Kadasane), अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर (Deputy Superintendent of Police Harish Khedkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे
(Police Inspector Pushpa Nimse), प्रशांत सपकाळे (Police Inspector Prashant Sapkale), पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी,
विजय गंगुल, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,
चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Anti Corruption Bureau Nagar | anti corruption bureau nagar arrested chief accountant of ahmednagar municipal corporation Huge excitement in nagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rupali Chakankar | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! रूपाली चाकणकर यांची ‘या’ पदावर केली नियुक्ती

EPFO-EDLI Scheme | ईपीएफओ मेंबर्सला ईडीएलआय योजनेची ‘ही’ सर्व वैशिष्ट्य माहिती असणं अत्यंत गरजेचं , जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कठोर, दिले ‘हे’ स्पष्ट आदेश