CM Uddhav Thackeray | मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कठोर, दिले ‘हे’ स्पष्ट आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अनधिकृत बांधकामावर (unauthorized construction) मुंबई महापालिकेने (BMC) युद्धपातळीवर तातडीने करवाई करावी. यामध्ये कोणाचाही दबाव सहन करु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांना विविध कामांबद्दल सूचना दिल्या

पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत (East and West Highway) देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे.
याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. कोविडमध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली आहे.
आता रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रीत करून कालबद्ध रीतीने ती कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा (Mumbai city)
देशात आदर्श निर्माण करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
आजच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Commissioner Iqbal Singh Chahal), सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी,
पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी (Ward officers) अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्यकठोरपणे यावर तातडीने कारवाई कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
मुंबईतील रस्ते दुरुस्ती (Road repair) कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा, कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळाली नाही पाहिजे हे पहा असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

खड्डे बुजविण्यास प्राधान्य द्या

आपल्याला शहर सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम व पूर्ण करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

नागरी सुविधांवर लक्ष्य केंद्रीत करा

कोविड लढाईत मुंबई मॉडेलची (Mumbai model) प्रशंसा झाली. आपल्या प्रयत्नांमुळे ते शक्य झाले आहे, टीमवर्क म्हणून आपण स्वत:ला सिद्ध केले आहे.
पण एवढ्याचवर न थांबता आता आपल्याला नागरी सुविधांवर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे.
ज्याप्रमाणे आपण दररोजच्या स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय पथके नेमलेली असतात त्याप्रमाणे डेब्रिजसाठी देखील पथके नेमावीत व बांधकामाचा कचरा,
दगड-विटा माती लगेचच्या लगेच कसा उचलता येईल हे पाहावे असेही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

कोविडचा धोका संपलेला नाही

सणांमागून सण येत आहेत, दिवाळी येतेय. एकीकडे कोविडचा (covid-19 ) धोका अजूनही संपलेला नाही.
युकेमध्ये कोविड संसर्गात परत वेगाने वाढ दिसते आहे.
तिथे परत रुग्णालये रुग्णांनी भरत आहेत, मी तेथील काही डॉक्टर्सशी सुद्धा बोललो असून आपल्याला देखील काळजी घ्यावी लागेल.
पावसाळा (Rain) संपत असताना मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), चिकनगुनिया (Chikungunya) या साथीच्या आजारांनी देखील डोके वर काढले असून आपण अतिशय काळजीपूर्वक हे रोग पसरण्यापासून रोखले पाहिजेत.
त्यागवृष्टीने सर्व प्रकारची जनजागृती देखील करा आणि डासांचा नायनाट प्रभावीपणे होईल, अस्वच्छता राहणार नाही हे पाहण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

 

Web Title : CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray directs bmc to take strong action against unauthorized constructions in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Benefits of Pani Puri | पाणीपुरी खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे ! आठवड्यात दोनवेळा खाल्ल्याने मुळापासून नष्ट होतील ‘हे’ आजार

PM Kisan च्या 10 व्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन दरम्यान तुमच्याकडून चूक तर झाली नाही ना? जाणून घ्या – कशी करू शकता दुरुस्त?

Mumbai News | नारायण राणे, कृपाशंकर सिंह, विजयकुमार गावित, पाचपुतेंच्या चौकशीचं काय झालं? NCP कार्यकर्त्यांचा सवाल