Anti Corruption | जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मागितली लाच; प्राचार्यासह एक जण अटकेत

हिंगोली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  जातवैधता प्रमाणपत्र (Caste Certificate) मिळवून देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना (accepting bribe) प्राचार्यासह खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Trap) रंगेहाथ पकडले. ही कारवाई सेनगाव येथे शुक्रवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Trap) सापळा रचून केली. प्राचार्य दिलीपकुमार विठ्ठलराव राठोड (Principal Dilip Kumar Vitthalrao Rathod), हनुमान गोरखनाथ रवने (Hanuman Gorakhnath Ravne) (रा. शिंदेफळ) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारकर्त्यांने त्यांच्या भाच्याचा जातपडताळणी प्रस्ताव हत्ता (ता. सेनगाव) येथील महाकाली माध्यमिक
व उच्च माध्यमिक विद्यालयाचे (Mahakali Secondary and Higher Secondary School)
प्राचार्य दिलीपकुमार राठोड यांच्यामार्फत पाठवून दिला होता.
त्यानंतर हिंगोली येथील जातपडताळणी कार्यालयातून ओळखीने भाचा व मुलीचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्राचार्य राठोड याने तक्रारकर्त्याकडे 2 हजारांच्या लाचेची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार एसीबीच्या (ACB) पथकाने तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी सापळा लावला.
प्राचार्य राठोड याने सेनगाव बसस्थानकाजवळील एका मेडिकलमध्ये हनुमान रवने याच्याकडे लाच देण्याचे सांगितले होते.
त्यानुसार तक्रारदाराने दिलेली रक्कम हनुमान रवने याने स्वीकारत स्वत:जवळ ठेवत लाच स्वीकारण्यास मदत केली.

ही कारवाई पोलीस उपधीकक्षक नीलेश सुरडकर (Deputy Superintendent of Police Nilesh Suradkar), पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय उपरे (Police Head Constable Vijay Upre),
पोलीस नाईक तान्हाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, पोलीस शिपाई अवि कीर्तनकार, पोलीस नाईक सरनाईक यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Anti Corruption | one person including principal was caught accepting bribe rs 2000 in hingoli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | उच्च न्यायालयाकडून ‘मोक्का’तून बाबा बोडकेसह तिघांची निर्दोष मुक्तता

Pune Pollution | पुण्यासह 18 शहरात प्रदूषण वाढले; मुंबई, सांगली, सोलापूरही ‘प्रदूषित’

BJP Jan Ashirwad Yatra | महाराष्ट्रात BJP ची नवी दुहेरी रणनीती; ‘या’ मंत्र्यावर सोपवली मोदी सरकारने मोठी जबाबदारी