महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – anti-corruption trap : राज्यात अनलॉक सुरु झाल्यानंतर आता आंतर जिल्हा वाहतूकीवरील बंधने दूर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता राज्यातील महामार्गावरील वाहतूकीत वाढ होणार आहे. मात्र, याचबरोबर महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना वेगळीच काळजी सतावत आहे. राज्यात अनलॉक होत असतानाच महामार्गावरील लाचखोरी पुन्हा जोर पकडून त्यातून अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप ( anti-corruption trap ) होण्याची भिती अपर पोलीस महासंचालकांना वाटत आहे.

‘त्या’ काळजीतूनच त्यांच्या कार्यालयाने राज्यातील सर्व महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकार्‍यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर या संबंधीचा एक मेसेज पाठविला आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, महामार्ग पोलीस अधिकार्‍यांनी कुणालाही पैशासाठी त्रास देऊ नये. कोरोनामुळे सध्या कठीण स्थिती असल्याने वाहनधारक थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे जातात.
एसीबीची कारवाई होऊ नये, यासाठी महामार्ग अधिकार्‍यांनी सतर्क रहावे.
आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना याबाबतच सूचना द्याव्यात.
महामार्गाचे पोलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षकांनी वाहनधारकांच्या पैशांसाठी होणार्‍या छळावर नजर ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

लठ्ठपणाने पीडित लोकांमध्ये लाँग कोविड इफेक्टचा धोका जास्त, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च

राज्यातील महामार्गांवर ६३ ठिकाणी महामार्ग पोलिसांची तपासणी नाकी आहेत.
त्याठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते.
विशेषत: जड वाहनांना ओव्हरलोड असल्याचे सांगून त्यांच्यावर कारवाईची भिती दाखविली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा कारवाई झाली तर विभागाची बदनामी होते. लॉकडाऊनच्या काळात आंतर जिल्हा वाहतूकीस बंदी असल्याने महामार्गावर पोलिसांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत होती.

दहावीच्या निकालासाठी 15 जुलैपर्यंत प्रतीक्षा ? आज किंवा उद्या आराखडा येईल समोर

E-Pass बाबत ‘संभ्रम’ आणि ‘गोंधळ’ ! पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच; आज येणार अधिक स्पष्टता – पोलीस

ई पास असला तरी काहीना काही त्रुटी दाखवून त्यांना अडविले जात होते.
परत माघारी पाठविण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचा कहाण्या सोशल मिडियावर लोकांनी टाकलेल्या दिसून येतात.
त्याचवेळी लॉकडाऊनमुळे नागरिकांना एसीबीकडे जाणे शक्य होत नसल्याने महामार्गावरील लाचखोरी बोकाळली होती.
मात्र, आता अनलॉकमध्ये नागरिक तातडीने एसीबीकडे जातील,
त्यातून विभागाची बदनामी टाळण्यासाठी अपर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून हे मेसेज पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)