कोलकात्तामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा पडदा फाडल्याचे वृत्तसमोर आले आहे. या कारणामुळे चित्रपटाचा शो रद्द करण्यात आले आहे चित्रपटाचं नाव हे अपमानास्पद असून या नावामुळे मनमोहन सिंग यांचा आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा अपमान झाल्याचं मत काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचं असून त्यांनी चित्रपटगृहात जाऊन पडदे फाडले त्यांचे हे वर्तन पहिल्या नंतर अनुपमखेर यांनी तात्काळ ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा निषेध नोंदवला आहे.
कोलकात्तामधील चित्रपटगृहात काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी जे कृत्य केले ते अत्यंत चुकीचं आहे. ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे शो रद्द व्हावेत यासाठी चित्रपटाचा पडदा फाडण्यात आला. ही असहिष्णुता आहे’, असं अनुपम खेर यांनी म्हटलं.
याप्रकरणी बंगालच्या युथ काँग्रेसचे अध्यक्ष शादाब खान यांनी सांगितलं. या चित्रपटाचे नाव अपमानास्पद असून या चित्रपटाचा निर्मात्यांना नक्की काय सांगायचं आहे ? १०० कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांबाहेर जो निषेध नोंदविला होता. तो योगच होता.