अनुराग कश्यपच्या मुलीला मिळाली जीवे मारण्याची धमकी, बिकिनी फोटो बनले कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. बॉलिवूडच्या इतर स्टार्सप्रमाणेच स्टार किड्सनाही बर्‍याच वेळा ट्रोल्सचा सामना करावा लागतो आणि त्याचा त्यांच्यावर खूप परिणाम वाईट होतो. याबद्दल बोलताना आलियाने सांगितले कि, कश्याप्रकारे तिला आपला लॉन्जरी फोटो शेअर केल्यानंतर ट्रोल केले गेले. ट्रोल झाल्यानंतर ती बराच वेळ रडत बसली.

आलीया ही चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि एडिटर आरती बजाज यांची मुलगी आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच आलियाने लॉन्जरीमध्ये तिची काही फोटो शेअर केले, त्यानंतर ती ट्रॉल्सच्या निशाण्याखाली आली. अलीकडेच आलियाने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सोशल मीडियावर या ट्रोलर्सचा ती कसा सामना करते हे सांगितले. आलिया म्हणाली, मला सोशल मीडियाच्या नकारात्मकतेसह संघर्ष करावा लागला. मी खूप भावनिक व्यक्ती आहे आणि अगदी लहान द्वेषदेखील मला त्रासदायक ठरतो. पण मला माहित नाही की मी का इतकी भावनिक आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींवर रडते. “याबद्दल ती पुढे म्हणाली,” जेव्हा मी लॉन्जरीमध्ये फोटो शेअर केला तेव्हा लोकांनी मला सांगितले की, मला लाज वाटायला हवी कि, मी एक भारतीय आहे आणि मी अशाप्रकारचे फोटो शेअर करते. लोक मला बलात्कार करण्याची धमकी देत होते. ते मला घाणेरड्या नावाने कॉल करीत होते आणि मला माझा ‘रेट’ विचारत होते. मलाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

आलिया म्हणाली की, ती अस्वस्थ झाली होती. पण या गोष्टींनी काही फरक पडत नाही कारण हे लोक त्यांच्या फोनच्या मागे लपून बसले आहेत आणि असे काहीतरी करण्याशिवाय आणखी चांगले काहीही नाही.” मी प्रामाणिकपणे सर्वांना ब्लॉक करते. माझ्या कोणत्याही सोशल मीडियावर दुरूनही काही नकारात्मक दिसत असल्यास, मी त्यांना ब्लॉक करते, कारण माझे सोशल मीडिया एक सकारात्मक प्लॅटफॉर्म असावे, अशी माझी इच्छा आहे. ”

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही योजना नाही

व्हिडिओमध्ये आलियानेही स्पष्ट केले की, तिची बॉलीवूडमध्ये येण्याची कोणतीही योजना नाही. ती म्हणाली, “मी बॉलिवूडच्या ग्लॅमरसोबत मोठी झाले नाही. माझे वडील जे चित्रपट बनवितात ते फार व्यावसायिक नसतात. मी माझ्या पालकांना पाहातच मोठी झाले आहे. पण माझ्यासाठी हे सामान्य आहे. मला याचा हेवा वाटला नाही. माझ्यासाठी असे नाही कि,ओह माय गॉड, हे बॉलिवूड आहे. मला हे करायचे नाही, मी त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. “