‘सिडनी’, ‘विरुष्का’ की ‘इराष्का’; विराट-अनुष्का यांना चाहत्यांनी सुचविले मुलीचे नाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची(Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा( anushka sharma) यांनी सोमवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्ट करून चाहत्यांना ही बातमी दिली. विराट वडील झाल्याची बातमी वेगाने पसरली आणि सोबत सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली की अनुष्काच्या मुलीचे नाव काय असेल? याबद्दल चाहत्यांनी अनेक अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.

एका वापरकर्त्याने ट्विटरवर लिहिले की, विराट-अनुष्काच्या मुलीचे नाव सिडनी असेल ? दुसऱ्याने अनुमान लावले की, तिचे नाव इरष्का असावे. vi (ira) t anu (shka). त्याचप्रमाणे, आणखी एका चाहत्याने सुचवले, “प्रिय किंग, तुझे आणि अनुष्काचे हार्दिक अभिनंदन, तसेच आपण आपल्या मुलीसाठी आश्विवा नावाचा विचार करू शकता.

एका वापरकर्त्याने विराट अनुष्काला तिच्या मुलाचे नाव अनुवी असे नाव सुचवले. वापरकर्त्याने लिहिले, “विराट कोहली तुम्हाला शुभेच्छा आणि देव तुमच्या पाठिशी आहे. जर मला एखादे नाव सुचवायचे असेल तर ते अनुवी असेल. त्याचा अर्थ तपासा, हे खूप सुंदर नाव आहे.” एका वापरकर्त्याने लिहिले की, टीम स्पिरिटचे म्हणणे आहे की विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नाव सिडनी असावे. अनुमा आणि अश्विनी या नावांचादेखील विचार केला जाऊ शकतो.

एका वापरकर्त्याने विनोद करत सोशल मीडियावर लिहिले- विरुष्काने खरंच आपल्या मुलीचे नाव विरुष्का ठेवले तर काय ? या लाडक्या जोडप्यास हार्दिक शुभेच्छा. एका वापरकर्त्याने लिहिले- विराट आणि अनुष्काला ए नावाने मुलीचे नाव न ठेवण्याचे आवाहन केले आहे. व्हिवा आणि परीक्षेदरम्यान खूप दुःख होते. मी हे माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगत आहे. उर्वरित भविष्यासाठी शुभेच्छा.