अनुष्का शर्माला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ होणार प्रदान

मुंबई :वृत्तसंस्था
चित्रपट क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलिवूड अभिनेत्री, निर्माती अनुष्का शर्माला मिळणार आहे.
अनुष्काला हा सन्मान निर्मिती क्षेत्रातील प्रशंनीय कामगिरीबद्दल मिळणार आहे. प्रोड्युसर म्हणून वेगळ्या धाटणीच्या कथा, प्रयोगशील कल्पना प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल हा गौरव होणार आहे. या पुरस्कारामुळे अनुष्काच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
‘एनएच 10’ या चित्रपटातून अनुष्काने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर फिलौरी, परी यासारख्या चित्रपटांची निर्मिती तिने केली. या तिन्ही चित्रपटांत अनुष्का मुख्य भूमिकेत दिसली होती.
अनुष्काने भाऊ कर्णेश शर्मासोबत ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ अंतर्गत चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अभिनेत्री म्हणून यशाच्या शिखरावर असताना तिने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. नवोदित कलाकारांना तिने चित्रपटातून चाम्गली संधी दिली. तिच्या याच कार्याची दाखल घेत फाळके पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एकंदरीतच अनुष्का आणि विराटाचे लग्नानंतर उत्तम करिअर सुरू झाले आहे.