प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात अनुष्कानं केलं शीर्षासन ! जबरदस्त व्हायरल झाला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळं चर्चेत आहे. अनुष्का आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) दोघंही बाळाची आतुरतेनं वाट पहात आहेत. अनुष्कानं 2021 मध्ये म्हणजेच नवीन वर्षात त्यांच्या घरी बाळाचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. अलीकडेच तिचे बेबी बंपचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. नुकताच अनुष्काचा असा एक फोटो समोर आला आहे जो पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. सध्या या फोटोची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

अनुष्कानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला ज्यात प्रेग्नंट असणारी अनुष्का पती विराट कोहलीच्या मदतीनं चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. फोटोत विराट तिच्या पायांना सपोर्ट करताना दिसत आहे. यात अनुष्काचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. ती 8 महिन्यांची प्रेग्नंट आहे.

अनुष्काचा हा फोटो पाहून सारेच चकित झाले आहेत. अशा अवस्थेत तिला योगा करताना पाहून चाहते हैराण झाले आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. सध्या तिचा हा फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिनं प्रोड्युस केलेला बुलबुल हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे ज्याला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. ॲक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

You might also like