अनुष्का शर्माने ‘फिल्मफेअर’साठी केलं ‘हॉट’ आणि ‘ग्लॅमरस’ फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव असणाऱ्या अनुष्काचे अनेक फोटो चर्चेत येत असतात. अनुष्काचा बिंधास्तपणा चाहत्यांना खूपच आवडतो. विराटमुळेही अनुष्का अनकेदा चर्चेत असते. पुन्हा एकदा अनुष्का तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नव्या फोटोशुटमधील तिचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माने फिल्मफेअर मासिकासाठी नुकतंच हे फोटोशुट केलं आहे. याच फोटोशुटमधील अनुष्काचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आले आहे. सध्या हे फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत.

वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये अनुष्काचे अनेक फोटो दिसत आहेत. फोटोत तुम्ही अनुष्काचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज पाहू शकता. चाहत्यांना भुरळ घालण्याची एकही संधी अनुष्का सोडत नाही.

अनुष्काचे फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे अनेक बोल्ड फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत. वर्ल्ड कपदरम्यानही विराटसोबत तिचे अनेक फोटोवर समोर आले होते. अनुष्काच्या फोटोंना चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अनुष्का शेवटची शाहरुख खानसोबत झिरो या सिनेमात दिसली होती. या सिनेमात शाहरुख आणि अनुष्काव्यतिरीक्त कॅटरीना कैफही मुख्य भूमिकेत होती. अनुष्का सध्या सिनेमांपासून दूरच दिसत आहे. अनुष्का सध्या कोणत्या सिनेमाचे शुटींगही करत नाहीये.

आरोग्यविषयक वृत्त –