‘विराट-अनुष्का’च्या लेकीचं बारसं ! अभिनेत्रीनं जाहीर केलं नाव

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच आईबाबा झाले आहेत. अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सर्वांना विरुष्काच्या मुलीच्या नावाबद्दल उत्सुकता होती. सोमवारी अनुष्कानं मुलीसोबत फोटो शेअर करत तिचं नाव जाहीर केलं आहे.

अनुष्कानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात विराट, ती आणि त्यांची गोंडस मुलगी दिसत आहे. तिनं मुलीचं नाव वामिका (Vamika) ठेवल्याचं जाहीर केलं आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

अनुष्काची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनुष्काच्या या पोस्टवर अनेकांनी अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे. अनुष्कावर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिनं प्रोड्युस केलेला बुलबुल हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे ज्याला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. अ‍ॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.