डिव्हिलियर्सला धावबाद केल्याने माजी कर्णधाराला मिळाली होती जिवे मारण्याची धमकी, स्वत: केला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट चाहत्यांचा वेडेपणा नेहमी पहायला मिळतो, जेव्हा त्यांची स्वत:ची टीम विजय मिळवते किंवा पराभवाचा सामना करते, तेव्हा विजयावर चाहते मनापासून जल्लोष साजरा करतात तर पराभावानंतर टीमच्या खेळाडूंवर आपला राग काढतात. 2011 वन-डे वर्ल्डकपमध्ये असाच काहीसा कटु अनुभव साऊथ आफ्रीकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसला आला होता.

दक्षिण आफ्रीकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने एक मोठा खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, न्यूझीलँडच्या विरूद्ध 2011 वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये गैरसमजाला बळी पडून एबी डिव्हिलियर्स धावबाद झाला होता. यानंतर त्याला आणि त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती.

डुप्लेसिसने म्हटले, मॅचनंतर मला आणि पत्नीला ठार मारण्याची धमकी मिळाली होती. इंटरनेट मीडियावर आमचे वाभाडे काढण्यात आले. हा खुपच वैयक्तिक हल्ला होता. अतिशय आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या गेल्या, ज्यांचा मी उल्लेख करू शकत नाही.

मीरपुरच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रीकेला 49 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह टीमचे टूर्नामेंटची सेमीफायनल खेळण्याचे स्वप्न भंग झाले होते आणि ते टूर्नामेंटच्या बाहेर गेले. भारतासोबत बांग्लादेश टूर्नामेंटचा सह आयोजक होता. भारताने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात श्रीलंकेला फायनलमध्ये पराभूत करून वर्ल्डकपचा किताब जिंकला होता.

1992 नंतर 2003 मध्ये साऊथ आफ्रीकेची टीम पहिल्यांदा सेमीफायनल मधून बाहेर गेली होती. त्यानंतर साऊथ आफ्रीका आतापर्यंत कधीही सेमीफाइनलच्या पुढे गेलेली नाही याकारणामुळे टीमला चोकर्स म्हटले जाते.