स्वॅग से स्वागत ! चेन्नई स्टेडियममध्ये ‘माही’ला पाहण्यासाठी पोहोचले ‘चाहते’, मैदानात जल्लोष (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी पुन्हा एका मैदानात चौकार, षटकारांची फटकेबाजी करताना दिसेल. इंडियन प्रीमिअर लीगचा फ्रेंचाइजी संघ चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणाऱ्या धोनीने सराव करण्यास सुरुवात केली आहे. चेन्नईच्या एम चिन्नास्वामीमध्ये धोनी सराव करण्यास पोहोचला आहे, तो तेथे पोहोचताच त्याचे हजारो चाहते तेथे जमा झाले होते.

आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार म्हणून नेतृत्व करणाऱ्या धोनीने कंबर कसली आहे. धोनी रविवारी चेन्नईला पोहोचला आणि माहितीनुसार तो सोमवारी सराव करण्यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल झाला. धोनीचे चेन्नईत दाखल झालेले फोटो चेन्नईच्या संघाने सोशल मीडियावर शेअर केले होते.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात धोनीचे चाहते त्याला चियर करताना दिसत आहेत. सीएसके फॅन क्लब सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे ज्यात धोनी मैदानात येताना दिसत आहे. हा व्हिडिओ आताचा आहे की जुने हे सांगणे अवघड आहे परंतु यात धोनी आपल्या चाहत्यांना हात हालवून अभिवादन करताना दिसत आहे.

विसेल पोडू आर्मी नावाच्या ट्विटर पेजवर धोनीचा हा व्हिडिओ सोमवारी संध्याकाळी 6 वाजता शेअर करण्यात आला आहे. यात हजारोच्या संख्येने दर्शक स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ एखाद्या चाहत्याने तयार केला आहे आणि तो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी दूरवर असल्याचे दिसत आहे आणि तो चाहत्यांना अभिवादन करत आहे.

वर्ल्ड कपनंतर धोनी भारतीय क्रिकेट संघापासून दूर –
आयसीसी वर्ल्ड कपमध्ये धोनीने अखेरचा सामना खेळला होता, सेमीफायनलमध्ये न्यूझीलँड विरुद्ध भारताच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर धोनी भारतीय संघातून बाहेर पडला होता.