Appa Londhe Murder Case | कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप; 9 जणांची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड आप्पा लोंढे खुन प्रकरणात (Appa Londhe Murder Case) न्यायालयाने मुख्य आरोपी विष्णू जाधव (Main Accused Vishnu Jadhav) याच्यासह 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली आहे.
आप्पा लोंढे याचा हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथे गोळ्या घालून (Firing) आणि धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता.

 

आप्पा लोंढे खून प्रकरणात (Appa Londhe Murder Case) न्यायालयाने गोरख कानकाटे (Gorakh Kankate) याच्यासह 9 जणांची सबळ पुराव्या अभावी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.
आरोपी संतोष भीमराव शिंदे Santosh Bhimrao Shinde (वय – 34 रा. शिंदवणे), निलेश खंडू सोलनकर Nilesh Khandu Solankar (वय – 30 रा. डाळिंब दत्तवाडी), राजेंद्र विजय गायकवाड Rajendra Vijay Gaikwad (वय – 24 रा. शिंदवणे), आकाश सुनिल महाडीक Akash Sunil Mahadik (वय – 20), विष्णू यशवंत जाधव Vishnu Yashwant Jadhav (वय – 37 रा. माळवाडी, सोरतापवाडी), नागेश लखन झाडकर Nagesh Lakhan Zhadkar (वय – 27 रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिरसेकर (District Sessions Court Judge Shirsekar) यांनी शिक्षा सुनावली.

 

न्यायालयाने आप्पा लोंढे प्रकरणातील (Appa Londhe Murder Case) नितीन महादेव मोगल Nitin Mahadev Mughal (वय – 27) मनी कुमार चंद्रा उर्फ आण्णा Mani Kumar Chandra alias Anna (वय – 45 रा. येरवडा पुणे, मुळ रा. रामपूर आंध्र प्रदेश)
विकास प्रभाकर यादव Vikas Prabhakar Yadav (वय – 31 रा. उरुळी कांचन),
गोरख बबन कानकाटे Gorakh Baban Kankate (रा. केरेगाव मुळ रा. इमानदारवस्ती ता. हवेली),
आण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी Anna alias Babadya Kisan Gawari (रा. मेमाणेवाडी ता. दौंड),
प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन (Pramod alias Bapu Kaluram Kanchan),
सोमनाथ काळूराम कांचन (Somnath Kaluram Kanchan),
रविंद्र शंकर गायकवाड Ravindra Shankar Gaikwad (रा. उरुळी कांचन)
प्रविण मारुती कुंजीर Pravin Maruti Kunjir (रा. वळती, ता. हवेली) यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

कुख्यात गुंड आप्पा उर्फ प्रकाश हिराभाऊ लोंढे याचा 28 मे 2015 रोजी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रोडवर पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडला होता.
चालत असताना साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर शिंदवणे रस्त्यावर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोऱांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला.
हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात आप्पा लोंढे याच्या छातीत व पोटात गोळ्या लागल्या.
त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. यामध्ये आप्पा लोंढे याचा जागीच मृत्यू झाला.
या खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य सुत्रधार विष्णु जाधव याच्यासह एकूण 15 जणांवर आरोपत्र दाखल केले होते.
या खटल्याचा गुरूवारी (दि.5) जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.

 

कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरात मोठी दहशत होती.
1990 पासून गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या आप्पा लोंढेवर खून, खुनाचा प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यासारखे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka देखील करण्यात आली होती.
तर चार गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. 2002 मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता.
आप्पा लोंढे खुन प्रकरणातील आरोपी गोरख कानकाटे याची निर्दोष सुटका झाली असली तरी विलास लोंढे खून प्रकरणात (Vilas Londhe Murder Case) तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

 

 

Web Title :- Appa Londhe Murder Case | with main accused vishnu jadhav and other five culpable convicted in notorious henchman appa londhe murder case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा