खुशखबर ! असा असेल Apple चा ‘तीन’ कॅमेरा असलेला ‘iPhone ११’ आणि ‘iPhone Max’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Apple लवकरच आपले नवे कोरे आयफोन लॉन्च करणार आहे. Apple iPhone ११ बाजरात लॉन्च करणार आहे. आयफोन बाजारात येणार असेल तर त्यांची सर्वत्र खूप क्रेझ असते. ट्विटरवर सध्या Slashleaks वर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात यूजर्सच्या हातात iPhone ११ दिसत आहे. फोटोत पहिले तर iPhone ११ मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या चर्चेत असलेल्या या मोबाइलमध्ये ‘युबा ट्रिपल कॅमेरा’ देण्यात आला आहे.

स्लैशलीक्स वर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोवरुन मानले जात आहे की Apple च्या आयफोन ११ चा वास्तविक फोटो आहे. या आयफोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय iPhone ११ ला यूट्यूबच्या एका व्हिडिओत पाहण्यात आले आहे. Marques Brownlee नावाच्या एका यूट्यूबरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात स्पष्ट दिसत आहे की आयफोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. सांगण्यात येत आहे की iPhone ११ मध्ये ५.६ इंचाचा आणि iPhone Max मध्ये ६.५ इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

तसे पाहिले तर या दोन्हीचे डिझाइन नॉच डिझाइन आहे. व्हिडिओ मध्ये दिसत आहे की फोन निळ्या आणि गोल्ड कलरमध्ये असू शकतात. याआधी सांगण्यात येत आहे की नव्या आयफोनला १० सप्टेंबरला सादर करण्यात येणार आहे. ट्रिपल कॅमेरा शिवाय अ‍ॅपल बॅटरीची क्षमता देखील वाढवेल. तसेच फास्ट चार्जिंग आणि रिवर्सिबल वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील असेल.