Apple Share Price | iPhone 15 लॉन्चनंतर कंपनीचे शेअर घसरले; अब्जावधींचे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन – Apple Share Price | अ‍ॅपल युजर्ससाठी आज आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे अॅपल कंपनीतर्फे आयफोन 15 लॉन्च करण्यात आला. अनेक ग्राहक या आयफोन 15 ची आतुरतेने वाट पाहत होते. आयफोन 15 मध्ये देण्यात आलेल्या सुविधा आणि आकर्षक फिचर यामुळे या मॉडेलची सर्वत्र चर्चा आहे. अ‍ॅपल युजर्ससाठी आज आनंदाचा दिवस असला तरी कंपनीसाठी मागील काही दिवस हे कठीण सुरु असल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅपलच्या नवीन मॉडेलला मागणी चांगली असली तरी देखील कंपनीचे सध्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. कंपनीचे शेअर्स आणि कंपनीची मार्केट व्हॅल्यू यामध्ये घट होत चालली आहे. (Apple Share Price)

अ‍ॅपल कंपनीचा आयफोन 15 लॉंन्च झाल्यानंतर अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये सुमारे दोन टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे कंपनीचे अब्जावधी डॉसर्लचे नुकसान झाले आहे. अ‍ॅपल कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे कंपनीचे तब्बल 47.76 अब्ज डॉसर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय रुपयांमध्ये त्यांचे मूल्य जवळपास 4 कोटी रुपये आहे. कंपनीचे शेअर घसरण्याचे मुख्य कारण चीनी कंपनी हुवावे टेक्नॉलॉजीज (Huawei Technologies) आहे. त्यांनी त्यांच्या शिपमेंटमध्ये 20 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या अ‍ॅपलच्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये चीन देखील एक मोठी बाजारपेठ झाली आहे. मात्र या बाजारपेठमधून कंपनीसाठी जास्त फायद्याची आणि चांगली बातमी समोर आलेली नाही. (Apple Share Price)

चीनच्या मार्केटमध्ये न होणारा नफा आणि तगडी स्पर्धा यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 5 दिवसांत 6 टक्क्याहून
अधिक घसरण झाली आहे. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, यंदा अ‍ॅपलच्या शेअर्स गुंतवणूकदारांना
चांगला परतावा देण्यात आला आहे. एक्सचेंज डेटानुसार, अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तज्ज्ञाच्या मते अ‍ॅपलच्या स्टॉकवर काही दिवस हा दबाव राहिलेला दिसू शकतो.
मात्र कंपनीच्या शेअर्समधील घसरणीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात देखील मोठी घसरण झालेली दिसून आली. ही घसरण 47.76 अब्ज डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये ही घसरण सुमारे 4 लाख कोटी रुपये आहे. एक्सचेंज डेटानुसार, सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 2.799 ट्रिलियन डॉलर्स होते, जे मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर 2.752 ट्रिलियन डॉलर्सवर आले. याचा अर्थ असा की कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 47 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त घसरण झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

OTT Release Marathi Movie | ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात ‘हा’ धमाल कॉमेडी चित्रपट रिलीज; चित्रपटाच्या विषयाने वेधले लक्ष