चीनला आणखी एक मोठा झटका ! अ‍ॅपलसाठी काम करणारी मोठी कंपनी भारतात

पोलीसनामा ऑनलाइन – नेलपेंटपासून विमानाच्या पार्टपर्यंत आणि सेफ्टी पिनपासून सेलफोनपर्यंत, चीन जगाचं ‘मॅन्युफॅक्चरिंग हब‘ होऊन बसलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आढळणारी अशी एकही वस्तू नाही, जी चीनमध्ये बनत नसेल. भलेही दर्जाच्या बाबतीत चिनी वस्तू सुमार असतील. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण चीन मध्ये आढळून आला. त्यानंतर जेव्हा रुग्णांची संख्या वाढत गेली तेव्हा जागतिक पातळीवरील पुरवठा विस्कळीत होऊ लागला. मग चीनमधील जगभरातील सर्व कंपन्यांनी दुसरा पर्याय शोधण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात महाग असणाऱ्या Apple च्या ६ प्रॉडक्शन लाईनने चीनमधून बाहेर पडून भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. Apple ची ही कॉन्ट्रॅक्टर कंपनी भारतात iPhones, टॅबलेट आणि संगणकासाठी प्रॉडक्शन लाईन सुरु करेल. त्यामुळे देशातील मार्केटची मागणी आणि तब्बल ५ अब्ज डॉलरच्या iPhones ची निर्यात करण्यात येईल. या माध्यमातून सुमारे ५५ हजार हजार जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. यासाठी Apple च्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे सामान घेऊन कंटेनर आधीच भारतात दाखल झाले आहेत.

केंद्र सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इंसेटिव्ह योजनेंतर्गत Apple साठी काम करणाऱ्या Wistron, Pegatron, Foxconn कोरियन कंपनी सॅमसंग ने भारतात उत्पादन सुरु करण्यास रस दाखवला आहे. यामध्ये भारतातील काही कंपन्यांचा समावेश आहे. Foxconn चा भारतात पहिला कारखाना आधीच आहे. तर Wistron, Pegatron लवकरच आपले कारखाने सुरु करतील.

देशात पुढील पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये ११.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे ३ लाख प्रत्यक्ष तर ९ लाख लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. या कंपन्यांनी उत्पादन सुरु केल्यावर ७ लाख कोटी रुपयांची निर्यात होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तयार झालेले ६० टक्के फोन निर्यात करण्यात येतील. तसेच या योजनेनुसार मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे काम १५ ते २० टक्क्यांवरुन वाढून ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी माहिती आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. दरम्यान, Pegatron ही Apple ची दुसरी मोठी कॉन्ट्रॅक्टर मॅन्यूफॅक्चरर आहे. त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का मानला जातो.