अजित पवारांकडे ट्यूशन लावा, मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंचा सल्ला

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाईन

जर तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी चांगले सरकार चालवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावाली असा खोचक सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक या गावाच्या दाैऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज्यात अजित पवार यांच्या एवढी उत्तम ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, तर त्याची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.

जर एखाद्या वर्गातील विद्यार्थी वारंवार त्याच वर्गात बसून अभ्यास करत असेल आणि नापास होत असेल तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्यात मुख्यमंत्र्यांची गत देखील अशाच प्रकारची झाली आहे. गेली तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान अनेक विषयाला हात घालत त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.