तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे आयुक्त पद्मनाभन यांनी सहायक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या मंगळवारी करण्यात आलेल्या आहेत. सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांना गुन्हे शाखा येथे तर पिंपरीचा अतिरीक्त पदभार, श्रीधर जाधव यांना वाकड येथे तर देहूरोडचा अतिरीक्त पदभार तर चंद्रकांत अलसटवार यांना चाकण सहायक पोलिस आयुक्तपदी देण्यात आले आहे. सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी तीनच सहायक पोलिस आयुक्त असल्याने प्रत्येकाला जादा पदभार दिला आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6723005a-9fee-11e8-9ac3-090aa42d997d’]

सहायक आयुक्त सतीश पाटील यांची गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. झोन एकमधील पिंपरी सहायक पोलिस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार  सतीश पाटील यांना देण्यात आला आहे. चाकण सहायक पोलिस आयुक्तपदी चंद्रकांत अलसटवार यांना दिले आहे. झोन दोन मधील वाकड सहायक पोलिस आयुक्तपदी श्रीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना देहूरोडचा अतिरीक्त पदभार देण्यात आला आहे.
शहरातील उपायुक्त कार्यालयाच्या विभाजनानुसार पोलीस उपयुक्तांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. यामध्ये झोन एकसाठी उपायुक्त म्हणून स्मार्थना पाटील तर दोनसाठी नम्रता पाटील यांची नियुक्ती केली आहे. उपायुक्त विनायक ढाकणे यांची मुख्यालय येथे नियुक्ती केली असल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.
पूर्वी शासनाकडून मंजूर झालेली झोन एक आणि दोनच्या हद्दीत बदल करुन नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सध्या शासनाने मंजूर केल्याप्रमाणे झोन एकमध्ये सहायक पोलिस आयुक्त देहूरोड आणि पिंपरीचा समावेश आहे. देहूरोडमध्ये देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, निगडी पोलीस ठाणे तर पिंपरी विभागात पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
झोन दोन मध्ये वाकड आणि चाकण सहायक पोलिस आयुक्त यांची हद्द आहे. वाकडमध्ये वाकड, हिंजवडी, सांगवी तर चाकणमध्ये दिघी, आलंदी, चाकण आणि चिखली पोलीस ठाण्याचा समावेश आहे. यामध्ये बदल करण्यात आलेला आहे.
झोन एकमध्ये  सहायक पोलिस आयुक्त देहूरोड काढून चाकणचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे झोन एकमध्ये चाकण आणि पिंपरीचा समावेश आहे. यामध्ये पिंपरी विभागात पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा तर चाकण विभागात दिघी, आलंदी, चाकण आणि चिखली पोलीस ठाण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. झोन दोन मध्ये वाकड आणि देहूरोड सहायक पोलिस आयुक्त यांची हद्दीचा समावेश करण्यात आला आहे. वाकडमध्ये वाकड, हिंजवडी, सांगवी तर देहूरोडमध्ये देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी आणि निगडी पोलीस ठाण्याचा समावेश केला आहे. हद्दीची फेररचना केलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती दिली.
उपायुक्त विनायक ढाकणे यांना मुख्यालय देण्यात आले आहे. यामध्ये गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, प्रशासकीय विभागाचा समावेश असण्याची शक्यता आहे. वाढता व्याप पाहता आणखी एक पोलीस उपायुक्त पदाची जागा निर्माण करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.