पुण्यात तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील पोलीस दलाती सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त पदी बढती देऊन बदल्या करण्यात आल्या. या बदल्या झाल्यानंतर पुण्यामध्ये तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयात नियुक्त करण्यात आलेल्या तीन सहायक पोलीस आयुक्तांचे सध्याचे नेमणूकीचे ठिकाणी आणि नवीन नेमणूक झालेले ठिकाण पुढील प्रमाणे…

नंदकुमार दत्तात्रय सातव (बदलीवर हजर नियंत्रण कक्ष, पुणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त अतिक्रमण विभाग, पुणे शहर)

धनंजय रघुनाथ धोपावकर (पदोन्नतीवर हजर नियंत्रण कक्ष, पुणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त मानवी संसाधन विभाग, पुणे शहर)

नागनाथ प्रभाकर वाकुडे (पदोन्नतीवर हजर नियंत्रण कक्ष, पुणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर)